भाजपा समजून घेण्यासाठी डॉ वाणीची भूमिका महत्वाची खा. गावित
तळोदा:भाजपा समजून घेण्यासाठी डॉ शशिकांत वाणी यांची भूमिका खूप महत्वाची होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला राजकारणात खूप मदत झाली.त्यांच्याकडून संयम हा गुण शिकून घेण्यासारखा आहे,असे प्रतिपादन खासदार डॉ हिना गावित यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रवेश कार्यकारणी सदस्य तथा श्री.साईंनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व रक्तदान शिबिराच्या उद्घाटन व प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाल्या की,मी भाजपात आली तेव्हा अगदी नवीन होती.सुरुवातीच्या काळात डॉ.वाणी यांची मोलाची साथ व सहकार्य मिळाले.अगदी नवीन असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला त्यांच्यामुळेच भाजप पक्ष समजून घेता आला. त्यांच्याकडून अनेक गुण शिकण्यासारखे आहेत. मी त्यांना कधीच चिडताना पाहिले असून त्यांच्या कमालीच्या संयम असून त्यातून कार्यकर्त्यांना समजून घेणे व जोडून घेण्यात ते नेहमीचं यशस्वी ठरतात.त्यांच्याकडे असणारे असे अनेक गुरूमंत्र आहेत, ते त्यांनी आम्हाला द्यायाला पाहिजे,असे सांगून त्यांनी सलग 29 वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या उपक्रमाचे देखील उपक्रमाचे कौतुक केले.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला सामाजिक राजकीय,शैक्षणिक,सहकार,अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, प्रगतिशील शेतकरी निसारअली मक्रानी, विश्वनाथ कलाल,भाजपा प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा श्याम राजपूत, डॉ स्वप्नील बैसाने,जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक व प्रतापपूरचे उपसरपंच सुरेश इंद्रजीत, प्रभाकर उगले,साहेबराव चव्हाण, प्रा. विलास डामरे,पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्जुन वळवी,भाजपा शहादा,तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे,विठ्ठल बागले, भाजपाचे माजी शहादा तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, हिम्मतराव चव्हाण,आदींसह तळोदा तालुक्यातील विविध गावांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांची यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मनोगत व्यक्त करताना डॉ.शशिकांत वाणी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ हिना गावित व आमदार राजेश पाडवी एकच व्यासपीठावर उपस्थित झाल्याबाबत समाधान व्यक्त केले.माझ्यासह जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा आंनदांचा क्षण आहे असून खासदार व आमदारांची अशीच एकजूट कायम राहून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अविनाश मराठे यांनी केले.