भोवरदा चापाडा-फणसपाडा मार्गावर काळ शेती नदीवरील पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे यांची नवीन पूल बांधण्याची मागणी
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील बहुचर्चित असलेले कौलाळे ग्रामपंचायत भवरद्याचापाडा-मोख्याचापाडा मार्गावर अनेक वर्षांपूर्वी बांधलेला अरुंद फुल पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याखाली सतत जात असल्याने या पाड्यांचा जव्हार शहराशी पूर्णपणे ग्रामस्थांचा संपर्क तुटून दोन्ही गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे यांनी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडे निवेदन देत या पाड्यांना जोडणाऱ्या नवीन फुल बांधण्याची मागणी केली आहे. मोख्या चापाडा, फणस पाडा, भोवर दाचा पाडा, कुंभार खांड या गावाची सुमारे १५०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावातील लोकांना पावसाळ्यात या अरुंद पुलाचा शालेय विद्यार्थी, रोजगारासाठी तालुक्याच्या ठिकाणी, सरकारी कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी, बाहेरगावी जाण्यासाठी, शेतकरी व रुग्णांना हॉस्पिटल ला जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने मोठी अडचण निर्माण होते.या निवेदनात सोमनाथ टोकरे यांनी जव्हार तालुक्यातील कुंडाचा पाडा, वनवासी, मार्गे मोख्या चापाडा, भोवर दा चापाडा, फणस पाडा या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करणे आणि चार पूल नवीन बांधणे हे देखील दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकारचे निकम साहेब यांना निवेदन सादर केले आहे.कौलाळे ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा-भवरद्याचा पाडा ते मोख्याचापाडा रस्त्याची अक्षरसा रस्त्याची चाळण झालेली आहे.अतिशय वाईट दुर्दशा झाली असल्याने कुंडाचा पाडा ते फणस पाडा रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करणे तसेच नदीवरील चार नवीन पूल बांधण्यात यावेत हा रस्ता सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.