तलावडी अनुदानित आश्रमशाळेत तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन
तळोदा तालुक्यातील तलावडी येथील अनुदानित शबरी सेवा समिती तळोदा यांच्या संयोजनाने तळोदा तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून शबरी सेवा समितीने या आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तळोदा तालुक्यातील १७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत तीन गटात तीन-तीन आवर्तनांची स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम तीन मुले आणि मुली या विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेचे बक्षीस व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेचे विजेते गट पहिला मुले पहिली ते चौथी यात प्रथम प्रणव प्रविण वसावे (इ.२ री), द्वितीय आकाश शिवराम पाडवी (इ.४थी), उत्तजनार्थ करण शिवराम वसावे (इ.४थी) तर मुली प्रथम कु.शिल्पा देवजी वळवी (इ.४थी), द्वितीय कु.निता अनिल ठाकरे (इ.४थी), उत्तेजनार्थ कु.दर्शना दिलीप रहासे (इ.४थी) तर पाचवी वी ते सातवी मुले गट दुसरा यात प्रथम कल्पेश अमरसिंग पाडवी (इ.५वी), द्वितीय साहिल चंद्रसिंग पाडवी (इ.५ वी), उत्तेजनार्थ सुमित सुरेश खर्डे (इ.७ वी), तर मुली प्रथम कु.गौरी किरसिंग वळवी (इ.६ वी), द्वितीय कु.प्रियांका धिरसिंग वसावे (इ.६ वी), उत्तेजनार्थ कु.हर्षा चेतन खर्डे (इ.५ वी), गट तिसरा ८ वी ते १० वी मुले यात प्रथम विरेंद्र सुरेश खर्डे (इ.१० वी), द्वितीय शनिष मोतीराम पाडवी (इ.१० वी), उत्तेजनार्थ करण काला वसावे (इ.१० वी), उत्तेजनार्थ विकास केवजी वसावे (इ.८ वी) तर मुली यात प्रथम कु.कलावती गेंद्या पाडवी (इ.९वी), द्वितीय कु.नंदना बहादुरसिंग ठाकरे (इ.८ वी), उत्तेजनार्थ कु.शितल देवजी वसावे (इ.१०वी), उत्तेजनार्थ कु.करुणा अपसिंग पाडवी (इ.८वी)
या स्पर्धांचे यशस्वीरित्या संयोजन शबरी तळोदा सेवा समितीचे नकुल ठाकरे, श्रीमती अरुणा मोरे, मोलगीचे चंपालाल वसावे, धडगांवचे देवीसिंग पाडवी यांनी केले यांनी केले. या स्पर्धा यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीवन पवार, अधिक्षक प्रविण वसावे यांनी मार्गदर्शन केले. तर अमोल पाटील, दिलीप पाटील, बबीता गावित, काश्मिरा पाटील, धनश्री आजगे, अलका तिडके, निता पावरा, दशरथ पाडवी, साईनाथ वळवी, राहुल जोशी, विजय मलाये आंदीनी परिश्रम घेतले.