रांझणी कृषि विद्यालयात कायदे विषयक साक्षरता व मार्गदर्शन कार्यक्रम
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात तळोदा तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक साक्षरता व जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळोदा न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती एस.जी.पांडे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा तहसिलदार गिरीश वखारे, पं.स.विस्तार अधिकारी बी.के.पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.जे.वाणी, सचिव ॲड.चंद्रकांत आगळे, ॲड.संजय पुराणिक, ॲड.किरण बैसाणे, ॲड.राहुल मगरे, ॲड.संदिप पवार, पोलिस निरीक्षक पंडीतराव सोनवणे, किशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तळोदा न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती एस.जी.पांडे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कायदे विषयक मार्गदर्शन करतांना न्यायमूर्ती श्रीमती एस.जी.पांडे यांनी सांगितले की, गावोगावी जाऊन नागरिकांना कायदे विषयक साक्षरता व जनजागृती व्हावी आणि प्रत्येकाला कायदा विषयी माहिती व्हावी. तसेच विधी सेवा करतांना वर्णभेद केला जात नाही. यात सर्वांना न्याय दिला जातो. तसेच नागरिकांनी आपल्या हक्काबाबत जागृत राहणेही गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले.
तसेच ॲड.राहुल मगरे यांनी सांगितले की,
वाहना संदर्भात रस्ता सुरक्षा कायदा बाबत अल्पवयीन वाहन चालक तसेच परवाना काढणे का आवश्यक आहे. परवाना नसल्यास त्याचे परिणाम काय याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तर तहसिलदार गिरीश वखारे यांनी महसूल विभाग व प्रशासनाविषयी माहिती दिली. तसेच रांझणी कृषि विद्यालयाचे प्रा.शरद साठे यांनी शेती विषयक तसेच पौष्टिक तृणधान्य युक्त पदार्थाचा आहारातील वापर, महत्व व त्याचे फायदे याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी मुकेश कापुरे यांनी केले. या कार्यक्रमाला चिनोदा-रांझणीच्या तलाठी शशिकला पावरा, रोझवाचे तलाठी जयवंत पाडवी, रावण ठाकरे, केशव पाडवी,
तसेच रांझणी गावातील यशवंत बोराणे, हेमराज भारती, शरद मराठे, किरण पाडवी, सुभाष पाडवी, कांतीलाल जांभोरे, महिला बचत गटाच्या महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विद्यालयाचे प्राचार्य प्रविण वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थींनीनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन प्राचार्य प्रविण वसावे यांनी मानले.