Type Here to Get Search Results !

त्रिप्ता वेलनेस सेंटरने केली मुलांची संक्रांत गोड



त्रिप्ता वेलनेस सेंटरने केली मुलांची संक्रांत गोड


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर 




त्रिप्ता वेलनेस सेंटर ही संस्था व्यसनाधीन लोकांसाठी विविध उपक्रम राबवित असून मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि विविध प्रशिक्षण देण्याचे काम करते. संस्थेने गेल्या काही महिन्यातच अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. जव्हार तालुक्यातील शिरोशी ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद शाळा तळ्याचापाडा येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना अभ्यासासाठी लागणार्‍या चांगल्या प्रतीच्या वह्या, ह्या भागात थंडी अधिक असल्यामुळे ब्लँकेट, मूगडाळ, संक्रांती निमित्त तिळगूळ, मुलांचे आवडते पेय इत्यादी साहित्याचे वाटप केले. त्याच बरोबर मुलाना फादर कॅजेटीन मिनेझिस व अमित पटेल ह्यानी आरोग्य व अभ्यासाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले, यावेळी ब्रुनो कोयलो व राजू जाधव देखील उपस्थित होते. उपक्रमासाठी अल्बा लोबो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आर्थिक मदत केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक महादू वाढू सर व सहशिक्षक चंद्रकांत मुकणे व सामाजिक कार्यकर्ते व ग्रा.पं. सदस्य मनोज कामडी,ग्रामस्थ ह्यानी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad