सेवाभावे प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त टाकळी येथे भव्य आरोग्य शिबिर.
सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे वर्धापन दिनानिमित्त चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिर टाकळी गावात घेण्यात आले प्रथम आई देव मोगरा व भारत माता यांच्या प्रतिमेला पूजन फुलहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती विमलगिरी हॉस्पिटलचे डॉ.सारंगी माळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश विजयसा सोनवणे,टाकळी गावाचे सरपंच फित्या दादा ठाकरे हे उपस्थित होते.
यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सागर भाई अरविंद पाटील,रुद्र मेडिकलचे मालक सौरभ माळी,ग्रामपंचायत सदस्य संजय वसावे,सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक अतुल पाटील,नकुल ठाकरे,टाकळी गावाचे पोलीस पाटील, बटूसिंग वसावे,खर्डीचे सुनील मदन मोरे,तळवे गावाचे राहुल साळुंखे,पांढुरके गावाचे राहुल वसावे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक नकुल दित्या ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केली
यावेळी विमलगिरी हॉस्पिटलचे डॉ. सारंगी माळी यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.
सेवाभावे प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेले आरोग्य शिबिराचे नियोजन प्रतिष्ठानचे सचिव कविता दिलीप कलाल, संचालक नकुल दित्या ठाकरे, संचालक अतुल भिमसिंग पाटील, कार्याध्यक्ष संतोष जगत चौधरी, अनिल भाऊ नाईक, चि.पवन विजय सोनवणे, चंभुलाल ठाकरे, रोहन गुरव, धरमसिंग ठाकरे, रोडत्या वसावे यांनी शिबिरासाठी मेहनत घेतली.