ट
तळोद्यात सैल वीज तारा उपाययोजना ची मागणी राष्ट्रवादीचे वीज अभियंत्याला निवेदन
तळोदा शहर वीज केंद्राच्या मागील रस्त्यावर वीज वाहक सैल तारा असून मोठी दुर्गघटना घेण्याची शक्यता आहे याकडे लक्ष घालावे वीज तारा उंच खेचण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वीज वितरण कंपनी उपभियंता यांना निवेदन देण्यात आले.
तळोदा वीज वितरण कंपनीच्या मागील बायापास रस्त्यावर लोंबकलेल्या विद्युत तारांन मुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या रस्त्यावरून नेमसुशील,शेठ.के.डी. हायस्कुल येथे ये जा करणाऱ्या मुलामुलींनी संख्या जास्त प्रमाणात आहे तरी लवकरात लवकर ह्या लोंबकलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करण्यात यावी ह्या साठी उपभियंता पाचपांडे साहेब यांना निवेदन देण्यात आले ह्या वेळी शराध्यक्ष योगेश मराठे,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, खजिनदार धर्मराज पवार,शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी,अल्प.स.शहर अध्यक्ष आदिल शेख,सहसंघटक मुकेश पाडवी, रवींद्र पाडवी,प्रकाश पाडवी उपस्थित होते.