तळोदा येथिल नॅशनल हायस्कूल मध्ये कुष्ठरोग निवारण दिवस साजरा करण्यात आला.
नॅशनल हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख इकबाल शेख उमर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करुन आपले मनोगत व्यक्त केले. नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तळोदे शहरात रॅली काढून जनजागृती केली. तसेच उपजिल्हा रुग्णालय तळोदा जिल्हा नंदुरबार येथील योगिता पाटील , अशोक पाडवी सुनंदा वळवी यांनी कुष्ठरोग या आजरा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली . नॅशनल हायस्कूल येथील शिक्षक जुबेर अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले नॅशनल हायस्कूल येथील शब्बीर मंसूरी एजाज कुरेशी, जुबेर अन्सारी , सय्यद मजहर , पठाण नाजनीन, शेख इरफान , सय्यद खालिद , सय्यद इम्रान , लष्करी जुबेर , आमिन खान , हमीद शेख इत्यादींनी परिश्रम घेतले. आभार कुरेशी एजाज यांनी मानले.