Type Here to Get Search Results !

मुरबाड मध्ये देवा गृप ठरतोय मोटारसायकल स्वरासाठी देवदुत!



मुरबाड मध्ये देवा गृप ठरतोय मोटारसायकल स्वरासाठी देवदुत! 


 रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी एक हजार हेल्मेट चे मोफत वाटप.देवा ग्रुपचा अनोखा उपक्रम


 मुरबाड दिनांक 30 प्रतिनिधी लक्ष्मण पवार




 मुरबाड तालुक्यात देवा ग्रुप हा मोटारसायकल स्वारांसाठी तथा अन्य दुचाकी स्वारांसाठी देवदुतांसारखे कार्य करत असून, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या देवा गृप चे अध्यक्ष मनोज देसले यांनी रस्त्यावरील मोटार अपघात रोखण्यासाठी आपल्या गृपच्या माध्यमातून आज सुमारे एक हजार हेल्मेट चे आमदार किसन कथोरे यांचे शुभहस्ते मोफत वाटप करुन मोटारसायकल स्वरासाठी एक देवदुताची भुमिका बजावली असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




 सध्या वाहनांची संख्या वाढत असली तरी अपघाता़ची देखील संख्या वाढत असल्याने या अपघातावेळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे किरकोळ जखमी असताना देखील मोटारसायकल स्वार आपला जीव गमावत असुन त्यामुळे अनेकांचे संसार देखील उघड्यावर येत आहेत.     




  महाराष्ट्र शासन अपंग बांधवांना तीन चाकी स्कुटर देऊन त्यांना स्वतः ला प्रवास करण्याची सुविधा देत असले तरी,त्यांचे सुरक्षिततेची उपाययोजना नसल्याने.ते अपघातात जखमी झाल्यास घरातील मंडळी त्यांचेवर उपचार करण्यासाठी राजी होत नाहीत.त्यामुळे देवा गृप ने या हेल्मेट वाटपात प्रथम अपंग मोटारसायकल स्वरांना प्राधान्य देऊन या अपघाता बद्दल जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे सुरक्षा अधिकारी यांचे मार्गदर्शन व आपले अनमोल जीवन कसे जगावे यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान सादर करुन प्रत्येक बाईक स्वार वापरत असलेल्या गाडीचे आर.सी.बुक, लायसन्स तसेच त्यांचे आधार कार्ड घेऊन सुमारे एक हजार हेल्मेट चे आमदार किसन कथोरे,देवा गृप फाऊंडेशनचे महाराष्ट्र सचिव तानाजी मोरे, मुरबाड नगरपंचायत चे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे उपनगराध्यक्षा मानसी देसले, मोहन सासे, मिलिंद मडके, नितीन सुर्यवंशी यांचे हस्ते मोफत वाटप करण्यात येऊन एक प्रकारे देवदुतांची भुमिका बजावली असल्याने या बाईक स्वरांचे कुटुंबियांनी देवा गृप या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले आहे   




याप्रसंगी आमदार किसन कथोरे व सुप्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांनी उपस्थित दुचाकी स्वारांना आपणच ठेवावी आपली सुरक्षितता असा सुचक सल्ला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad