कल्याण- मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवून जपली सामाजिक बांधिलकी !
सर्व स्तरातून सुभाष पवार यांच्या अनोख्या उपक्रमाबद्दल अभिनंदन!
मुरबाड दि.२५ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड- कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील शिवले, मुरबाड, सरळगाव, यावर जीव घेणे खड्डे पडले होते कदाचित या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊ शकला असता परंतु याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत, कारण दरवर्षी या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडलेले असतात तरीही या खड्ड्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यां वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन बऱ्याच प्रमाणात अपघात झाल्याची घटना घडल्या आहेत तरीही या खड्ड्यांविषयी प्रसार माध्यमातून अनेक वेळा वृत्त छापले गेले तरीही याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यावरुन जात असताना मोठ्या प्रमाणात अपघात झाले त्या अपघातामध्ये बरेच जणांचे बळी गेले आहेत.
अखेर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा बाळासाहेबांची शिवसेना ठाणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी मागेपुढे न पाहता स्वखर्चाने सदर पडलेले मोठमोठे खड्डे बुजविले त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अनोखी उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे यांनी दिली आहे.