मुरबाड मधून ७८ सरपंच ६८ उपसरपंच ७२६ ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश!
मुरबाड दि.२५ प्रतिनिधी लक्ष्मण पवार)
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना एक नंबरचा पक्ष वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी मोठ्या प्रमाणात जाळं निर्माण करून एक प्रकारे विरोधी पक्षाला मोठ्या प्रमाणात टक्कर देऊन एक प्रकारे आवाहन उभे केले आहे. नुकताच ठाणे येथील टीप टॉप प्लाझा हॉटेलमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना उपनेते प्रकाश पाटील माजी आमदार बरोरा मुरबाड कल्याण संपर्कप्रमुख संजय निमसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये७८ सरपंच, ६८ उपसरपंच, ७२६ ग्रामपंचायत सदस्य तसेच मुरबाड नगरपंचायतीचे पाच नगरसेवक तसेच बाजार समितीचे सर्व संचालक खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी एकाच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने मुरबाड तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना नंबर पक्ष एकचा बनला आहे याचे सगळे श्रेय भावी आमदार म्हणून सुभाष पवार यांच्याकडे जात आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा धनाजी दळवी यांनी केले .
या सर्व प्रवेशामुळे मुरबाड तालुक्यात पुढील होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, व इतर खरेदी विक्री संघ बाजार समिती या निवडणुकीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र नुकताच केलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या प्रवेशावरून दिसून येत आहे.