Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संधेला जि.प. मॉडेल स्कूल रोझवे पुनर्वसन येथे सांस्कृतीक महोत्सव साजरा



प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संधेला जि.प. मॉडेल स्कूल रोझवे पुनर्वसन येथे सांस्कृतीक महोत्सव साजरा                           



तळोदा - रोझवे पुनर्वसन जि. प मॉडेल स्कुलात राष्ट्रिय मतदार दिनाचे औचीत्य सांस्कृतीक कार्यक्रमा द्वारे मतदार जागृती , स्त्री शिक्षण , अंधश्रध्दा निर्मूलन , बेटी बचाओ , व्यसनमुक्ती अशा ज्वलंत विषयाचे नाटके आणि सांस्कृतीक कार्यक्रमाद्वारे स्पर्श करण्यात आला . जवळपास १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . 




      सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शा . व्य .स. अध्यक्ष कबीर पावरा, प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षण अधिकारी शेखर धनगर, केंद्रप्रमुख निकुंभे, भरत पावरा , बुसरा वसावे आदी उपस्थित होते . विद्यार्थ्यांच्या सुप्त गुण आणि भाविष्यवेदी शिक्षण देण्यासाठी एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसीत करण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे स्थान अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगीतले . मुख्याध्यापक मणीलाल नावडे यांच्या मार्गदर्शनाने शाळेची गुणवता वाढत असून सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ यांचे चांगल्या समन्वयाचे कौतुक केले . सदर कार्यक्रमा प्रसंगी गावातील मोठ्या प्रमाणावर माता, पालक , ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद गांगुर्डे , रमेश राऊत , विनायक गावीत , सुरेश पाटिल . रायसिंग वसावे , रविंद्र पाडवी , श्रीमती चित्रा वळवी , जयवंती चौधरी , श्रीमती सुनंदा सुकणे बीरारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन रविंद्र मुसगे यांनी केले .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News