Type Here to Get Search Results !

बचपन ब्लॉसम स्कूल येथे आपत्कालीन व्यवस्थापनेवर प्रात्यक्षिके



बचपन ब्लॉसम स्कूल येथे आपत्कालीन व्यवस्थापनेवर प्रात्यक्षिके 


 तळोदा येथील बचपन ब्लॉसम स्कूल येथे आपत्कालीन व्यवस्थापनेवर नियंत्रण करण्यासाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

 मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनात काही प्रसंग ओढवल्यास मुलांनी न घाबरता हृदयविकार ,उष्माघात, विजेचा धक्का ,सर्पदंश, आग, भूकंप या गोष्टींवर मात करण्यासाठी तसेच आपल्या नातेवाईक ,घरातील सदस्य यांचा जीव वाचवण्यासाठी काय प्रयत्न करावेत याविषयी प्रात्याक्षिके दाखवण्यात आली.                                            



यावेळी शाळेचे चेअरमन डॉ योगेश चौधरी प्राचार्य विजयकुमार पाटील उपप्राचार्य सकीना मर्चंट ईएमएसचे वैद्यकीय अधिकारी डॉ वंदना बडगुजर ,आरोग्य सेविका अक्का पावरा, औषध निर्माता दिगंबर मराठे रुग्णवाहिकेचे चालक गजेंद्र परदेशी, स्टाफ नर्स विशाल चौधरी, तसेच अग्निशमन दलाचे कमलेश कलाल ,मुकेश रामवंशी उपस्थित होते.




 यावेळी वैदकिय अधिकारी डॉ वंदना बडगुजर यांनी हृदयविकाराची व्याख्या सांगतांना हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने अडथळा निर्माण होऊन हृदयाला रक्तपुरवठा खंडित होणे व त्यामुळे हृदयाच्या स्नायू निकामी होणे याला हृदयविकाराचा झटका असे म्हणतात असे सांगत आपल्या घरात किंवा सभोवताल हृदयविकाराचा रुग्ण आढळून येताच तात्काळ 108 वर कॉल करून संबंधित रुग्णाला मदत करावी तसेच उष्माघाताबद्दल सांगताना उष्माघात एक गंभीर वैद्यकीय अवस्था असून ज्यामध्ये आपल्या शरीराचे तापमान 40°c पेक्षा जास्त होते. त्यामुळे शरीर स्वतःचे तापमान सामान्य पातळीवर टिकवूनन ठेवू शकत नाही .सामान्यतः आपले शरीर उच्च तापमानात घामाद्वारे थंड होते. पण यात असे होत नाही असे सांगत हा आजार मुख्यतः उन्हाळ्यात होताना दिसून येतो त्यामुळे उन्हाळ्यात याविषयी जास्त काळजी घ्यावी .शक्यतोवर तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे .हलकी पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत .बाहेर जाताना छत्री, टोपी, बूट, चपलांचा वापर करावा.प्रवास करताना पाण्याचे बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करत असलेल्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या डोक्यावर टोपी किंवा छत्रीच्या वापर करण्यास आठवणीने सांगावे. तसेच पुरेशी काळजी न घेतल्यास कुणालाही आणि कुठेही विजेचा शॉक लागू शकतो. शॉक लागल्यानंतर संवेदना कमजोर होण्यापासून ते अगदी काहींना हृदयविकाराचा झटका येईपर्यंत त्रास होऊ शकत असल्याचे सांगत शक्यतो लहान बालकांनी विद्युत विद्युत उपकरणांना हात लावण्यात टाळावे. तसेच आपल्या घरात कुणालाही विद्युत शॉक लागला असल्याचे निदर्शनास आल्यास लाकडी फळीचा वापर कसा करावा याबाबत सांगितले.




प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी आपल्याला भूकंपाचा सामना करावा लागल्यास आपण राहत असलेल्या घरातुन ताबडतोब घराबाहेर पडण्याचे मार्ग शोधावे तसेच मोकळ्या जागेत आश्रय घेण्याचा प्रयत्न करावा. झाडाखाली किंवा अन्य कोणत्याही गोष्टींचा आडोशाला जाऊ नये . जर आपण घरात अडकून पडल्यास बाहेर जाणे शक्य नसल्यास घरातील टेबल अथवा तत्सम अशा मजबूत फर्निचर खाली लपावे यामुळे आपला जीव वाचू शकतो. शक्यतो डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. अनावश्यक हिरोगिरी करण्याचा प्रयत्न करू नये असे सांगितले.

 उपप्राचार्य सकीना मर्चंट यांनी सर्पदंश विषयी खबरदारी घेताना सांगितले की आपल्या कुटुंबात ,सभोवताली ज्या व्यक्तीला सापाने दंश केला आहे त्याला घाबरवण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करावा. कारण घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विचार संपूर्ण शरीरात विष पसरू शकते. चाव्याच्या जागी कोरडी पट्टी किंवा कपड्याने झाका.जवळच्या प्रा आ केंद्र,उपजिल्हा रुग्णालय अशा ठिकाणी त्या व्यक्तीला लगेच हलवा, घाव धुवू नये, घावावर बर्फ लावू नका, जखमेतून विष शोषुन घेण्याच्या प्रयत्न कुणी करत असल्यास असे करू देऊ नका तसेच दाट गवतातून फिरण्यापूर्वी , धाडसी उपक्रमाला जाण्यापूर्वी जाड बूट,लांब पॅन्ट घालावी रात्री मशाल ,टॉर्च घेऊनच घराबाहेर पडावे ,कोणताही खडक किंवा दगड हलवताना, डोंगराळ भागात फिरताना ,लहान तलावात खेळताना विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले तसेच इंधन ,ऑक्सिजन, उष्णता या तीन गोष्टी एकत्र आल्याने आग लागत असल्याचे सांगत परिसरात कुठे आग लागली असल्याचे निदर्शनास आल्यास 101 या क्रमांकावर टोल फ्री क्रमांकावर कॉल करून अग्निशमन दलाला पाचारण करावे तसेच आपल्यासमोर एखादा अपघात झाल्यास तात्काळ 108 वर कॉल करून अपघातग्रस्तांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे तसेच आपले कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी यांना नेहमीच रहदारींच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यास सांगावे तसेच कोणी वाहन जोरात हाकत असेल तर त्यालाही वाहन आपल्या मर्यादेत चालवण्यास सांगावे असे त्यांनी सांगितले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिल्व्हिया बागूल यांनी तर आभार प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News