महत्वाच्या रस्त्याच्या मधात नाल्यासाठी सोडली जागा . प्रशासनच अजब गजब काम
टाकरखेडा संभु मधून जो रस्ता अमरावती साऊर रामा शिराळा सारख्या अनेक गावांना जोडला गेला आहे.100 ते 200 वाहने नेहमी या रस्त्यावरून येणं जाणं करतात.
शासनाचे अजब काम पाहून अनेक गावकरी चकित झाले आहे त्याला कारण सुद्धा तसेच आहे.
मधातली जागा सोडून बाकी दोन्ही बाजूला रस्त्याची डागडुजी केल्या गेली.त्यामुळं अपघातच प्रमाण वाढू शकते.
नेमका हा रस्ता करण्यामागे शासनाचा नेमका हेतू कोणता असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. रस्त्याच्या मधात जी जागा सोडली तिथे जर गाडीचे चाक चुकून इकडेतिकडे गेले तर वाहन चालवणारा हा गाडी घेऊन पडू शकतो आणि मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो .त्यामुळं शासनाच्या अशा बेलगाम कामाचं सर्विकडे कौतुक होत आहे.