हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पवित्र स्मृतिस देवळा येथे अभिवादन
प्रतिनिधी - दादाजी हिरे
महाराष्ट्राचं जगद्विख्यात नेतृत्व, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट नाशिक जिल्हाध्यक्ष देवानंद बापू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली देवळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थितांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी भाजपा गटनेते संभाजी आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, देवळा तालुका प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, देवळा शहर प्रमुख नाजिम तांबोळी, नगरसेवक जितेंद्र आहेर, मनोज आहेर, करण आहेर, गणेश ढवळे शहर संघटक उपशहर प्रमुख योगेश देवरे भूषण देवरे, योगेश आहेर सुनील चव्हाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.