Type Here to Get Search Results !

शिरवाडा येथे संत रामपाल महाराज यांचा भगतमिलन सोहळ्यात रमणी विवाह संपन्न.



शिरवाडा येथे संत रामपाल महाराज यांचा भगतमिलन सोहळ्यात रमणी विवाह संपन्न.


नंदुरबार तालुक्यातील शिरवाडा येथे ग्रामपंचायत भावनातील प्रांगणात नंदुरबार जिल्ह्यातील रामपाल महाराजांच्या सर्व भक्तांचा भगतमिलन सोहळा व सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून नवापूर,शहादा, तळोदा,धडगाव,अक्कलकुवा या तालुक्यातील सर्व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये संत रामपाल महाराज यांच्या सत्संगा मध्ये उपस्थित अनुयायांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.




   यामध्ये सत्संगात रामपाल जी महाराज यांनी समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सर्व समाजात सतभक्ती कशी दृढ होईल याकडे सर्व भक्तांनी लक्ष द्यावे तसेच या जगामध्ये सम्पूर्ण नशामुक्ती साठी नशा केल्याने होणारे दुष्परिणाम याविषयी सर्व भक्तांनी जनजागृती करावी., त्याचबरोबर हुंडा मुक्त लग्न पद्धती व लग्नात होणार वायफळ खर्च कसा वाचविता येईल या विषयी समाजप्रबोधन भक्तांनी करावे असे आवाहन केले.

     त्याचबरोबर आपल्या सत्संगातून परमात्मा कबीर साहेब यांच्या विषयी सांगताना खरा परमात्मा कोण याविषयी सखोल माहिती दिली.

         यावेळी सर्व भक्तगण त्यांचा सत्संग लक्षपूर्वक ऐकत होता.यावेळी शिरवाडा गावात बाहेरगावाहून येणाऱ्या श्रोते वर्गाच्या स्वागतासाठी सेवेदार नेमण्यात आले होते. त्याचबरोबर चहा व पाण्याची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती त्याचबरोबर पार्किंग तसेच पुस्तक स्टॉल,ही लावण्यात आला होता.

     या सोहळ्यात काकरपाडा येथील देवजी दाद तसेच कंसई येथील अंजना दासी यांचा रमणी विवाह सोहळा देखील संपन्न झाला या अनोख्या सोहळ्याचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी भगत समुदायाबरोबर जगत समुदाय देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. अवघ्या १७ मिनिटात सम्पन्न झालेला विवाह पाहून जगत समुदाय अचंबित झाला.ना कुठला खर्च ना कुठला हुंडा,किंवा कुठल्याही प्रकारची वाजंत्री नाही.किंवा जेवणावळ नाही अगदी साध्या पद्धतीने हा विवाह झाला.या विवाह सोहळ्याचे सर्व उपस्थितांकडुन कौतूक करण्यात आले.

    या अनोख्या सत्संग व विवाह सोहळ्यात शेवटी सर्व भक्तांना चहापान व बिस्किट प्रसाद म्हणून देण्यात आला तद्नंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad