Type Here to Get Search Results !

फुलसावंगी ग्रामपंचायतच्या गलथान कारभाराने सार्वजनिक नालीचे घाण पाणी शिरते घरात



फुलसावंगी ग्रामपंचायतच्या गलथान कारभाराने सार्वजनिक नालीचे घाण पाणी शिरते घरात


 माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव


वार्ड क्र ०६ मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  फुलसावंगी ग्रामपंचायत मधील वार्ड क्र.०६ मधील रहीवाशी अमोल ढवळे यांनी घरासमोर असलेल्या सार्वजनिक नालीवर रापटा टाकून नालीचे बांधकाम करावे यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतला निवेदन दिले.वेळोवेळी ग्रामसभे मध्ये आवाज उठावला परंतु झोपेत असलेल्या ग्रामपंचायतने वेळीच दखल घेतली नाही.




त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उशीरा का होईना ग्रामपंचायत ने दखल घेतली व थातुर मातुर स्वरूपात दोन सिमेंट चे बांबू टाकून घाण पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला परंतु पाणी व्यवस्थितपणे न काढता.जाग्यावरच साचुन रहात आहे.अमोल ढवळे यांच्या घरासह इतरांच्या घरात हे पाणी जात आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.




सदरील रस्त्यावरून चालणे देखील कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे सदरील बांबू काढून त्या जागी पक्या स्वरूपाची सिमेंट ची नाली बांधून त्यावर रापटा टाकावा व घरासमोर साचलेले पाणी सुरळीत करावे अशी मागणी अमोल ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad