Type Here to Get Search Results !

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर तळोदा येथे आमदार कार्यालयाच्या प्रांगणात भाजपा तर्फे निषेध व्यक्त



तळोदा - हिवाळी अधिवेशनात ना. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर तळोदा येथे आमदार कार्यालयाच्या प्रांगणात भाजपा तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.




    याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केले होते त्या अनुषंगाने आज तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यालयाच्या आवाराचा प्रांगणात त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले संभाजी राजे यांच्या अपमान केला आहे. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका असे म्हणणारे ना लायक अजित पवार जो पर्यंत विरोधी पक्षनेते पदाच्या राजीनामा व महाराष्ट्राची माफी मागत नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्यात आंदोलन सुरू राहिल अस इशारा दिला त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.




  याप्रसंगी भाजपाचे नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी , बळीराम पाडवी, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, शाम भाऊ राजपूत किसान मोर्चा प्रदेश चिटणीस, नगरसेवक रामानंद पाडवी, अमानोद्यीन शेख, गोकुळ गुरव, गौरव वाणी, कैलास चौधरी, शिरीष माळी, रसिलाबेन देसाई, भारतीबाई कलाल,

 आदिंसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad