Type Here to Get Search Results !

सिद्धगड येथे स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे हस्ते ज्योत प्रज्वलित करून अभिवादन!



सिद्धगड येथे स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे हस्ते ज्योत प्रज्वलित करून अभिवादन! 

 

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई क्रांतिकारकांना अभिवादन करण्यास चुकले

 मुरबाड दिनांक 3 प्रतिनिधी लक्ष्मण पवार




भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिना निमित्त सिद्धगड येथे सोमवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली हीच वेळ साधत सिने दिग्दर्शक एकनाथ देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचा प्रसंग नाट्य रुपात सादर केला त्यावेळी सर्वांच्या अंगावर शहारे आले




       या कार्यक्रमासाठी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे , माजी आमदार गोटिराम पवार , दिगंबर विशे , सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव , ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार , सदस्य उल्हास बांगर , रेखाताई कंठे , मुरबाड पंचायत समिती सभापती स्वरा चौधरी , उल्हासनगर महानगर पालिकेचे उप महापौर भगवान भालेराव , स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते




      एक जानेवारीच्या सायंकाळ पासून सिद्धगड पर्वताच्या घळीत असलेल्या बलिदान भूमीत ठाणे , रायगड व पुणे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी व देशप्रेमी नागरिक दाखल झाले होते रात्रभर सुरू असलेल्या वकृत्व व समूहगीत स्पर्धा मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली 




      सिद्धगड येथील कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी सिद्धगड स्मारक समितीला सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे नातेवाईक हरी नारायण देशमुख यांचे वतीने दोन लाख रुपये देणगी देण्यात आली होती त्यामध्ये वाढ करून आणखी तीन लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली तर उल्हासनगर महानगर पालिकेचे उप महापौर भगवान भालेराव यांनी 50 हजार रुपयांची देणगी दिली 



  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad