मुरबाड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला युवकांचा प्रतिसाद
सामाजिक न्याय विभागाचे मुरबाड शहर अध्यक्ष विलास जाधव यांच्या पुढाकाराने वाढतोय राष्ट्रवादी पक्ष
मुरबाड दिनांक 17 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग मुरबाड शहर नवीन कार्यकारणीची नुकताच मुरबाड शहराध्यक्ष विलास जाधव यांनी घोषणा केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे नवतरुण युवकांचा कल वाढला असून राष्ट्रवादीला विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरबाड जनसंपर्क कार्यालय येथे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष संतोष बाईत व मुरबाड शहराध्यक्ष विलास जाधव यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र,शाळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागात वेगवेगळ्या पदाची धुरा सोपवण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव यांच्या आदेशानुसार व त्यांनी माझ्यावर टाकलेली पक्ष वाढीसाठी जिम्मेदारी मी एकनिष्ठेने पार पाडीन असे उद्गार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विलास जाधव यांनी सांगितले
यावेळी विठ्ठल तुळशीराम खंडागळे सल्लागार पदावर तर पांडुरंग मंगल भोईर उपाध्यक्ष ,रंजनाताई अरुण जाधव उपाध्यक्ष, राजन दुधेश्वर गिरी उपाध्यक्ष , हैदर अली शफिक अन्सारी मोमीन सरचिटणीस,
सुमित्रा संतोष रोकडे चिटणीस, स्वप्निल बाळू रोकडे कोषाध्यक्ष, ज्ञानेश्वर यशवंत रोकडे चिटणीस, आकाश अरुण गायकवाड प्रसिद्धी प्रमुख, योगेश बाळाराम वाळंज सदस्य, धोंडू हैबत मुकणे सदस्य, गुरुनाथ अशोक भोईर सदस्य, प्रमोद चौधरी यांची सदस्य पदावर निवड करण्यात आली असून त्यांना शहराध्यक्ष विलास जाधव आणि तालुकाध्यक्ष संतोष बाईत यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न सोडविण्याचा संकल्प केला आहे.