कुपोषणाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी टास्क फोर्स नेमा खासदार राजेंद्र गावित यांची मागणी
रिक्त पदे तात्काळ भरण्याचे प्रशासनाला गावितांचे आदेश
मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी
मोखाडा: पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग आणि शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम सावर्डे गावात दोन बालकांचा कुपोषणाने अवघ्या दहा दिवसांत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच खासदार राजेंद्र गावित यानी सावर्डे येथे प्रत्यक्ष भेट कुटूंबांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली व वस्तुस्थिती जाणून घेतली तसेच यावेळी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरत सावर्डे येथील अंगनवाडीतील मदतनिसचे रिक्त असलेले त्याचबरोबर तालुक्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश दिले अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देखील आहे
मोखाड्यातील अतिदुर्गम सावर्डे गावातील अंगणवाडीतील दुर्गा कल्पेश निंबारे (११ महिने) ही मुलगी सतत आजारी असायची. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंबर महिन्यात ऊपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान दुर्गाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तर रोजगारासाठी भिवंडी तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या रेणुका मुकणे (३ महिने) या कुपोषित बालिकेचा मृत्यू झाला आहे. दहा दिवसाच्या अंतरात सावर्डे येथील अंगणवाडी क्षेत्रातील दोन बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी बोलताना सांगितले की कुपोषणाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली
गेल्या अनेक वर्षापासून येथील कुपोषण पाठ सोडायला तयार नाही परंतु तरीदेखील हळूहळू प्रशासनाच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असुन कुपोषणाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभाग आदिवासी विभाग एकात्मिक आदिवासी विभाग या सर्व विभागाच्या माध्यमातून या भागात टास्क फोर्स नेमला गेला पाहिजे व त्या माध्यमातून येथील कुपोषणा आळा घातला जाऊ शकेल असे बोलताना सांगितले
तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी पंधरा दिवसातून भेट द्यायला पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही तसेच खोडाळा विभागात 25 मदतनीस पदे रिक्त असून दोन प्रवेशिका यांचे पदे रिक्त असुन यामुळे मुख्य विकेवर ताण पडतो यावेळी गावितानी बोलताना सांगितले मोखाड्यात तीव्र कुपोषित बालके115 व अती तीव्र कुपोषित बालके 26 असुन अनेक बालके दगावत आहेत ही ही वस्तुस्थिती असून आमचे देखील अपयश असल्याची खंत यावेळी गावितानी व्यक्त केली
यावेळी मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले प्रभारी गट विकास अधिकारी कुलदीप जाधव आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे उपसभापती प्रदीप वाघ भाजपाचे युवा मिलिंद झोले हनुमंत पादिर तसेच सरपंच उपसरपंच उपस्थित होते