रांझणी येथील कृषि विद्यालय परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
तळोदा तालुक्यात रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालय परिसरातील प्रक्षेत्रावर बिबट्यासह दोन बछड्याचा मुक्त संचार दिसून आल्याने शेत राखणदार करणार्या कुटुंबामध्ये तसेच शेतकरी, शेतमजूरांमध्ये प्रंचड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की, दि.९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास रांझणी येथील येथील कृषि विद्यालय परिसरातील शेतातील शेतात काम करणार्या मजुरांना व शेत राखणदार कुटुंबाला अचानक बिबट्यासह बिबट्याचे दोन बछडे समोरच दिसल्याने तसेच केळीच्या क्षेत्रात बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने घाबरलेले मजूर व राखणदारांनी ताबडतोब कृषि विद्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.
सध्या परिसरात सर्वत्र ऊस तोडणी सुरू असून तसेच शेतकर्यांकडून रब्बी हंगामातील गहू पेरणी, केळी लागवड, ऊस लागवड करण्यात आली असून या गहू, हरभरा, केळी, ऊस पिकांना शेतकऱ्यांकडून फवारणी करणे, खते देणे रात्री-अपरात्री पिकांना पाणी देणे अशी शेतीची कामे करण्यात येत असतात. त्यातच कृषि विद्यालय परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आहे. यामुळे कृषि विद्यालय परिसरातील शेतशिवारातील शेतकरी, शेतमजूर व शेत राखणदार यांच्यामध्ये भीतीचे पसरली असून बिबट्यासह दोन बछड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.