Type Here to Get Search Results !

रांझणी येथील कृषि विद्यालयातील खेळाडूंची विद्यापीठस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड



रांझणी येथील कृषि विद्यालयातील खेळाडूंची विद्यापीठस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड 



 तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयातील पाच खेळाडूंची महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, जि.अहमदनगर येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून खो-खो मुले या क्रीडा स्पर्धेत तीन खेळाडू व व्हाॅलिबाॅल मुले या क्रीडा स्पर्धेत दोन असे एकूण पाच खेळाडूंची राहुरी येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. 

        दरम्यान दि.१० जानेवारी २०२३ रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच धुळे घटक कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डाॅ.प्रा.राहुल देसले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या आंतर विद्यालयीन जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा कृषि विद्यालय साक्री येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन धुळे घटक कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डाॅ.प्रा.राहुल देसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस.बी.आगळे, एस.एस.मराठे, जी.आर.सोनवणे तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य व क्रिडा शिक्षक उपस्थित होते.  

     या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयाचे दहा खेळाडू सहभागी झाले होते. यात खो-खो मुले या स्पर्धेत महेश सिंगा नाईक, दिनेश दिवल्या ठाकरे, महेश शिरीष पाडवी, अविनाश जिवा वळवी, कुशल दिलवरसिंग पाडवी, तर व्हाॅलिबाॅल मुले या स्पर्धेत महेंद्र चुनिलाल जांभोरे, गोपाल धनाजी तडवी, चेतन हितेंद्र भारती, प्रदिप बिजला पाडवी, देवेंद्र गजानन पवार या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यात महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय क्रिडा स्पर्धेत कृषि तंत्र विद्यालय रांझणी येथील खो-खो मुले या स्पर्धेत महेश सिंगा नाईक, अविनाश जिवा वळवी, कुशल दिलवरसिंग पाडवी या तीन खेळाडूंची निवड करण्यात आली. तर व्हाॅलिबाॅल मुले या स्पर्धेत गोपाल धनाजी तडवी, देवेंद्र गजानन पवार या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली.     

     तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे होणाऱ्या क्रिडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार जैन, सचिव घनःश्याम चौधरी, संचालक कुमारपाल जैन, प्राचार्य प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, प्रा.भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींनी विद्यापीठ स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक करून विद्यापीठस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.

     या विद्यापीठस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंसाठी रांझणी कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रविण वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा शिक्षक प्रा.शरद साठे, जिजाबराव पवार, भिक्कन पाटील, राजेश पाडवी आदींनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad