राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांचा आदिवासीं समाजाला अभिमान
कोठार येथे लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार
तळोदा: देशाच्या सर्वोच्च पदावर एक आदिवासीं महीला विराजमान झाल्या असून त्यांचा सर्व आदिवासीं समाजाला सार्थ अभिमान आहे,असे प्रतिपादन कोठारचे सरपंच लोकनियुक्त सरपंच मोतीलाल पाडवी केले.
तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शाळेचे माजी विद्यार्थी लोकनियुक्त सरपंच व ग्रापंचायत सदस्य म्हणून निवडणूक आल्याने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी व्यासीठावर ग्रामपंचायत सदस्य किरण बटूसिंग वसावे, हिरालाल पाडवी,विलास नाईक, मोगी मोतीलाल पाडवी, रोशनी मगन पाडवी, मुन्नी जोलू गावित आदी उपस्थित होते. कार्यक्रमांत शाळेचा माजी विद्यार्थी गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा व सर्व ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक सीएम पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या देवी याहा मोगी मातेचे प्रतिमा देवून सत्कार देवून करण्यात आला.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माध्यमिक शिक्षक जयवंत मराठे यांनी शाळेची स्थापनापासून ची वाटचाल ग्रामस्थांच्या सहकार्य व भूमिका याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हंसराज महाले यांनी केले. यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो: तळोदा तालुक्यातील कोठार येथे कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना लोकनियुक्त सरपंच मोतीलाल वसावे सोबत व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य किरण वसावे, हिरालाल पाडवी,विलास नाईक, मोगी पाडवी, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, सी एम पाटील,आदी....