ऊसाच्या एकरी उत्पादनात लक्षणीय घटने शेतकऱ्यांमध्ये चिंता
तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन ,चिनोदा,प्रतापपूर सह परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात येत असते .तसेच दरवर्षी एकरी उत्पन्नही चांगले मिळत असते .पण यावर्षी उसाच्या एकरी उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे बोलले जात असून शेतकऱ्यांमध्ये याबाबत चिंता व्यक्त होत असून उत्पन्नात घट होण्याची कारणे त्यांच्याकडून शोधण्यात येत असल्याचे चित्र आहे .
दरम्यान अपुरा पाणीपुरवठा, सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या ताळमेळ नसणे, अपेक्षित मशागतीचा अभाव, सातत्याने एकच पीक घेणे यामुळे उसाच्या एकरी उत्पन्नात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे .
काही शेतकऱ्यांकडून ऊसतोड लावण्यासाठी पाणी बंद करूनही एक दीड महीने ऊसतोड होत नसल्याने उसाचे वजन कमी होऊन एकरी उत्पादनात मोठे तफावत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदरीत शेतकरींकडून एकरी उत्पादनात होणाऱ्या घट बाबत आत्मचिंतन सुरू असून त्यांच्याकडून उत्पन्न वाढीसाठी विविध पर्याय शोधले जात आहेत