तळोदा येथे शहादा रोडवरील सौरदिवे दुरुस्त करावेत मागणी
तळोदा शहरातील शहादा रस्त्यावर सौरदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना गैर सोय होत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सौरदिवे दुरुस्त करावेत अशी मागणी निवेदनात केली आहे
याबाबत पालिका मुख्याधिकारी यांना भोई समाज नवयुवक मंडळाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, नगरपालिकेच्या वतीने तळोदा- शहादा रस्त्यावर सौर दिवे लावण्यात आले आहेत परंतु वनविभाग ते चेक पोस्ट ह्या दरम्यान लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त आहेत ते फक्त शोभेचे ठरत आहे, पहाटे फिरणारे नागरिकांना अंधारामुळे तेथून जीव मुठीत धरून फिरत असतात कारण तेथे सूर्योदया अगोदर व सूर्यास्तानंतर अंधाराचे साम्राज्य अधिक गडद होते. या अंधारामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. ते टाळण्यासाठी याकडे पालिकेने लक्ष घालावे. लवकरात लवकर बंद सौर दिवे दुरुस्ती करून प्रकाशमान करावे परिसर प्रकाशमान करावा अशी मागणी निवेदन करण्यात आली आहे.निवेदन देतांना भोईसमाज जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, तालुका अध्यक्ष धनलाल शिवदे, जगदीश वानखेडे, गणेश शिवदे, नीरज रामोळे, गिरीश वानखेडे, सचिन भोई आदी उपस्थित होते