मध्यप्रदेश व गुजरात राज्यांना जोडणारा शहादा, म्हसावद, मोलगी, पिंपळखुटा, वडफळी हया रस्त्यांस हायब्रीड एन्युटी योजनेअंतर्गत मंजूर करावा- नागेश पाडवी
तळोदा:- मध्यप्रदेश व गुजरात राज्यांना जोडणारा शहादा, म्हसावद, मोलगी, पिंपळखुटा, वडफळी हया रस्त्यांस हायब्रीड एन्युटी योजनेअंतर्गत करणेत यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनात केली आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे कि,
नंदुरबार जिल्हयातुन मध्यप्रदेश व गुजरात राज्यांना जोडणारे अतिदुर्गम भागांतील महत्वाचा असा शहादा, म्हसावद, दरा, धडगांव, मोलगी, पिंपळखुटा, वडफळी हा रस्ता एम एच ०१ हायब्रीड एन्युटी अंतर्गत करण्यात यावा यामुळे दुर्गम भागातील धडगांव, मोलगी, पिंपळखुटा, वडफळी या रस्त्यांची रुंदीकरण होवून रस्त्यांची मजबुती येईल. त्यामुळे हया 'भागातील गांव पाडयांना सोयीचे होणार आहे.
तरी मध्यप्रदेश व गुजरात राज्यांना जोडणारा रस्त्यांस आपल्या स्तरावरुन मंजुरी मिळावी तसेच स्टेच्यू ऑफ युनिटी हे स्थळ वडफळी जि. नंदुरबार येवुन ४५ कि. मी. जवळ पडणार आहे असेही निवेदनात मागणी भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश दिलवरसिंग पाडवी केले आहे.