तळोद्यातील मेन रस्त्याचे काम गतीने पूर्ण करा व्यापारी महासंघाचे मुख्याधिकार्यांना निवेदन
तळोदा :- शहरातील मेन रोड रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. या रस्त्यावरील मुरलीधर मंदीर ते स्मारक चौकादरम्यान व्यापार्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून मेन रोडच्या कामाला गती देवून त्वरीत काम पूर्ण करावे, अशी मागणी तळोदा व्यापारी महासंघाने केली आहे.
याबाबत तळोदा मुख्याधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, तळोदा शहरातील प्रमुख वर्दळीच्या असलेल्या मेनरोडचे काम नगरपालिकेकडून सुरु करण्यात आले आह.े परंतू या मेनरोडवरील मुरलीधर मंदीर ते स्मारक चौकादरम्यान रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. गेल्या महिन्याभरापासून हे काम संथ गतीने सुरु असल्याने रस्त्यालगतच्या व्यापार्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने रस्त्याचे काम लांबणीवर पडत आहे. म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देवून मेन रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी तळोदा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार, सुभाष चव्हाण, मुकेश वाणी, राजेंद्र कोचर, मनोज भामरे, हंसू भंडारी, मुकेश जैन आदींनी निवेदनातून केली आहे.