Type Here to Get Search Results !

तळोदा पोलीसांनी तर्फे रेझिंग-डे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिना निमित्त शासकीय आश्रम शाळा तलावडी येथे हत्यारां संबंधित सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली



तळोदा पोलीस ठाणे हद्दीत रेझिंग-डे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने तळोदा पोलीसांनी तर्फे तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा तलावडी येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याचे हत्यारां संबंधित सर्व प्रकारची माहिती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली




तसेच सायबर क्राईम संबंधित माहिती व नेहमीच मोबाईलच्या अती वापराचे दुष्परिणाम, वाहन चालवताना, व पाई चालतांना रहदारीचे सर्व नियमबाबत सखोल माहिती सदर शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, पोना अजय पवार,पोना.अजय कोळी, पोकॉ अनिल पाडवी यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थीनींना सविस्तर मार्गदर्शन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News