Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक साठीअतुल्य स्पोर्ट्स च्या 3 खेळाडूंची निवड.



महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक साठीअतुल्य स्पोर्ट्स च्या 3 खेळाडूंची निवड.


 मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी 


    महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक फेडरेशन तर्फे आयोजित मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अतुल्य स्पोर्ट्स अकॅडमी च्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.

       अतुल्य स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे चालविण्यात येणाऱ्या अतुल्य स्पोर्ट्स अकॅडमी च्या योगेश वाक,देविदास कामडी आणि सचिन वारे या खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

    अतुल्य स्पोर्ट्स फाऊंडेशन ही संस्था ग्रामिण भागातील मुलांच्या शैक्षणिक व क्रीडात्मक विकासासाठी कार्य करते.खेळ व अभ्यास यांचा योग्य मेळ घालून मुलांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.

          अतुल्य स्पोर्ट्स च्या मुलांनी मिळविलेल्या या यशामुळे सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक प्रितेश निळे तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनुप ठाकूर यांचे मार्गदर्शन या खेळाडूंना लाभत असते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष .बांगर सर,.विसपुते मॅडम यांची सरावासाठी मदत होत असते.महाराष्ट्र राज्यातील फक्त पहिल्या आठ जिल्ह्यांची निवड या स्पर्धेसाठी झालेली आहे.खुल्या गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी अतुल्य स्पोर्ट्स च्या खेळाडूंनी पहिल्या तीन क्रमांकावर आपला शिक्का जमवत या स्पर्धेत प्रवेश निश्चिती केली.

      संस्थेचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक पवन आडवळे त्याच प्रमाणे अंकुश कामडी यांनी स्पर्धेसाठी या खेळाडूंची उत्तम तयारी करून घेतली.

        जानेवारी 2023 मध्ये जळगाव येथे होणाऱ्या मिनी ऑलिम्पिक फेडरेशन ऑफ महाराष्ट्र आयोजित स्पर्धेत हे खेळाडु खेळणार आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad