प्रजासत्ताक दिनानिमित्त सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा तर्फे तीन गावांमध्ये भारत माता पूजन करण्यात आले
आज 26 जानेवारी 2023 रोजी तळोदा तालुक्यातील रावलापाणी, खर्डी,जांबाई या गावांमध्ये भारत माता पूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद रावलापाणी शाळेचे धनंजय सूर्यवंशी सर रावलापाणी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रतिलाल भाऊ पावरा,भीष्मा भाऊ पावरा,राजेंद्र पावरा,संदीप पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते खर्डी येथे सुनील भाऊ मदन मोरे,भानू महाराज, मुकुंदा मोरे व गावकरी उपस्थित होते जांबई गावात प्रतिष्ठानचे दिलवर भाऊ पावरा,उत्तम पावरा,पिंटू ठाकरे व समस्त गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांच्या नियोजनाने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.