भाजप नंदुरबार जिल्हा सरचिटणीसपदी बळीराम पाडवी
तळोदा - भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथील बळीराम हुऱ्या पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते प्रदान केले. या नियुक्तीबद्दल बळीराम पाडवी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.