Type Here to Get Search Results !

कोणीतरी पोलिस व्हाव म्हणून कोणीतरी झगडतय मोखाडा उपसभापती प्रदीप वाघ यांच्या कडून स्वखर्चाने तालुक्यातील विविध ठीकाणी शिबीर



कोणीतरी पोलिस व्हाव म्हणून कोणीतरी झगडतय मोखाडा उपसभापती प्रदीप वाघ यांच्या कडून स्वखर्चाने तालुक्यातील विविध ठीकाणी शिबीर


पुस्तके गोळाफेकचे मोफत वाटप,तज्ज्ञ लोकांची मार्गदर्शने ..


 मोखाडा   प्रतिनिधी :सौरभ कामडी 




          सध्या राज्यात मोठ्याप्रमाणावर पोलिस भरती निघणार असून यांच्या तारखाही जाहिर झाल्या आहेत यासाठी मोखाडा तालुक्यातील अनेक तरुण तरुणी या भरतीसाठी जीवाचे रान करीत आहेत मात्र असे करताना योग्य मार्गदर्शन आर्थिक स्थितीमुळे पुस्तकांची कमतरता भरतीसाठीचे प्रशिक्षण याचा अभाव होत असल्यामुळे अनेक वेळा मुलांना अपयश येते मात्र यासगळ्यासाठी स्वतःचीच आर्थिक परीस्थिती बेताची असतानाही पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी मात्र एक आदर्श उपक्रम राबवयाला सुरवात केली असून पोलिस भरती व वन विभाग भरतीसाठी प्रशिक्षण देणारी मार्गदर्शन करणारी शिबिरे तालुक्याच्या सर्व भागात भरवीत माझा आदिवासी तरुण तरुणी होतकरू तरुण या भरतीत उतीर्ण व्हायला हवा यासाठी झटत आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




                तालुक्यातील चास याठीकाणी नुकतेच प्रशिक्षण शिबीर पार पडले असुन यामध्ये उपनिरीक्षक भुसाळ सर ,  क्रीडा शिक्षक खोरागडे सर पीआरटीसीचे तुंबडे सर आदिनी मार्गदर्शन केले तांत्रिक आणि मैदानी प्रात्यक्षिक दाखवत भरतीसाठी प्रयत्नशील तरुणांना मध्ये यावेळी चैतन्य निर्माण केले यावेळी बोलताना वाघ यांनी किती जागा आणि यासाठी किती लोक याचा विचार न करता आपल्याला हवी असलेली एक जागा मिळवायची, त्याजागेसाठी आपली संपूर्ण क्षमता पणाला लावा असे आवाहन येथील तरुणांना केले.तसेच फार काहि नाही मात्र मी तुमच्यातलाच एक व्यक्ती म्हणून हि मदत करीत असून ते माझे कर्तव्य आहे.याभागातील जास्तीत जास्त तरुणांनी भरती प्रक्रीयेत होण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 




           वाघ यांनी आतापर्यंत तालुक्यातील सुर्यमाळ कारोगांव चास या जवळपास तालुक्याच्या चारही कोपऱ्यात स्वखर्चाने अशी प्रशिक्षण शिबीरे घेतली यामध्ये वेळोवेळी पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरिक्षक, क्रीडा शिक्षक, पत्रकार तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आमंत्रित करून या तरुणांना मार्गदर्शन केले एवढेच नाही तर याभरतीशी संबंधित पुस्तके लोखंडी गोळे आदि साहित्यही अगदी मोफत दिले यामुळे या सर्व तरुणांनी वाघ यांचे मनापासून आभार मानले आहेत.अनेक भागात प्रशिक्षणाच्या नवाखाली हजारों रुपयांची फि आकरण्यात येते पुस्तकांवर हजारो रुपये खर्च करावे लागतात.मात्र याभागातील तरुण गरीब आहे मात्र होतकरू आहे अशांची अडचण ओळखून वाघ यांनी अक्षरशः तालुका पिंजून काढला आहे .यावेळी पोलिस प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक (माजी सैनिक) तुंबडे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच  सजय वाघ पोलिस पाटील विठ्ठल गोडे , नदु वाघ  मगेश दाते  ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News