पिपंळशेत आठवडी बाजाराला नागरिकांचा उत्सपूर्त प्रतिसाद
मात्र नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील पिपंळशेत गावात शनिवारी आठवडी बाजार भरत असून या बाजारात पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात या मुळे बाजाराला उत्सपूर्त प्रतिसाद मिळत असतो. परंतु नागरिकांच्या सोई सुविधांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना संसार उपयोगी जीवनावश्यक वस्ती व भाजीपाला खरेदी करण्यासाठी तालुक्याला जाने सर्वांनांच शक्य नसल्यामुळे नागरिकांना हे खेड्यागावातच मिळावं यासाठी आठवडी बाजार लाभदायक ठरत असून या साठी खेडो-पाड्यातील आदिवासी बांधव आठवडी बाजारात येत असतात. लागणार सामानाची खरेदी करतात. या मुळे आठवडी बाजाराला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून नागरिक ही चांगला प्रतिसाद देत असतात.
गणपत भेस्कर (मा.ग्रा.सदस्य) :
"ग्रामपंचायतची जबाबदारी आहे, सौचालय उभारून नागरिकांच्या सोई सुविधाकडे लक्ष द्यावे"