Type Here to Get Search Results !

नंदुरबार गवळी समाजातर्फे सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त अभिवादन



नंदुरबार गवळी समाजातर्फे सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त अभिवादन


नंदुरबार वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत बालब्रह्मचारी परमपूज्य श्रीसंत सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त बालवीर चौकात प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.




महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था नंदुरबार आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी नंदुरबार नगर परिषदेचे कर्मचारी पांडुरंग यादबोले यांच्या हस्ते परमपूज्य बालब्रह्मचारी श्रीसंत सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांनी आरती गायली.महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी श्रीसंत सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या कार्याला उजाळा दिला. श्री संतसिदाजी आप्पा देवर्षी यांचा जन्म दि.1 जानेवारी 1882 रोजी झाला असून मोहिनी एकादशी 1967 ला त्यांचे देहावसान झाले.कर्नाटक राज्यातील चिडगुपा येथे भव्य मठ आहे.प्रतिवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा राज्यातील गवळी समाज बांधव दर्शनासाठी हजेरी लावतात.अभिवादन कार्यक्रमास शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे यांनी शंखनाद केला.आरती नंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. विशाल हिरणवाळे, सुदाम गवळी, प्रफुल्ल राजपूत, दिलीप कुंभार, नितीन तावडे, राकेश भोई, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad