तळोद्याच्या उपक्रमशील नगरसेवकांचा कार्यपुर्ती सोहळा प्रभाग 2 च्या रहिवाश्यांच्या वतीने कार्याचा गौरव
तळोदा येथील प्रभाग क्रमांक दोन चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका सौ. अनिता परदेशी यांच्या पांच वर्षाच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे कामे केलीत व मतदारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहिले म्हणून त्यांच्या छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रम प्रभाग क्रमांक दोन मधिल बद्री कॉलोनीतील मतदारांच्या वतीने करण्यात आला.
सदर कार्यक्रमात नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी, संदीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे आदिच्या सत्कार प्रभाग क्रमांक दोन मधील बद्री कॉलोनीतील मतदारांन तर्फे करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक कसा असावा याबाबत निसारभाई मक्राणी,जाकीर मनसुरी, याकुब पिंजारी,फिरोज पिंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रभागातील जनतेचे नगरसेवक व नगरसेविका यांच्या प्रतीचे प्रेम पाहून तळोद्यात येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे हितू भाऊ,अनिता ताई सारखेच नगरसेवक आम्ही प्रत्येक प्रभागात देऊन प्रभाग क्रमांक 2 च्या जनतेप्रमाणेच् विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू,
तर यावेळी दोन्ही नगरसेवकांनी सत्कारा प्रसंगी सांगितले की, यापुढे आम्ही नगरसेवक असलो नसलो तरीही या प्रभागातील नागरिकांचे कामे तन मन धनाने करु गेल्या पाच वर्षांत आमची सत्ता नसतांनाही जो शब्द मतदारांना दिला होता तो आम्ही पाळला व प्रभालाच आमचा परिवार समजून आम्ही काम केलीत व प्रभागतील जनतेने ही आम्हाला परिवारातील पोरान सारखे प्रेम दिले.
तसेच संदीप परदेशीं यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे जे कामे सांगितली गेली ती कामे प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला.प्रभागात 5 वर्षात केलेली काम थोडक्यात सांगत सदर पाच वर्षांत या प्रभागामध्ये आम्हाला जे सहकार्य व प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
सदरच्या या कार्यक्रमा प्रसंगी मुस्लिम समाज अध्यक्ष आरीफ नूरा, निसारभाई मक्राणी, याकुब पिंजारी,आदिल शेख,जाकीर मनसुरी, सादिक सैय्यद, समद मनियार, सादिक पिंजारी, महेमूद कुरेशी, मोहसिन कुरेशी, कलीम कुरेशी, नासिर हाजी,नदिम बागवान,राहुल पाडवी,गणेश राणे, धर्मराज पवार, इमरान शिकलीकर, आदिंसह मुस्लिम बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश मराठे यांनी केले.