भरड-चिंचखेडी रस्त्यावर सागवानी वाहतूक करतांना त्यात २० दांडी सागवानी ०.७६५ घ.मी.१५ हजार ४८६ रु किंमतीची लाकूड वाहन दिड लाख किंमत वाहन असे एकूण १ लाख ६५ हजार ४८६ रु किंमतीच्या मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई धडगांव वनविभागाने केली आहे
वनपाल माकडकुंड,वनरक्षक अट्टी, वनरक्षक धडगाव व रेंज स्टाफ बिलगाव यांना गुप्त बातमीवरून भरड-चिंचखेडी रस्त्यावर संशयावरून पीक अप वाहन क्रमांक एम.एच.०४ डी.एस.८४६१ ची तपासणी केली असता विनापासी, विनाशिक्क्याचे, विनापरवाना अवैध वाहतूक करताना अडविले. वाहनचालक अंधाराचा गैरफायदा घेऊन जंगलात पसार झाला. सदर वाहन किंमत अंदाजे १लाख ५०हजार व जप्त मुद्देमाल साग दांडी नग २० घ.मी.०.७६५ माल किंमत १५ हजार ४८६ रु किमतीचे लाकूड धडगाव टिंबर डेपोत पावतीने जमा केला. वनरक्षक अट्टी एम.एम.वळवी यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(१),४२(ब)चे उल्लंघन, भा.व.अ.१९२७ चे कलम ५२(१)अन्वये जप्त केला. त्यांच्याकडील वनगुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाईत वनसंरक्षक धुळे ( प्रा.) विवेक होशिंग, विभागीय वनाधिकारी संजय पाटील , उपवनसंरक्षक नंदुरबार कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक (रो.ह.यो.) अक्राणी संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अक्राणी (प्रा.)सौ.चारुशिला काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल माकडकुंड बी.एम.परदेशी, वनरक्षक एम.एम.वळवी, अनिल पाडवी, गुलाबसिंग तडवी,वसंत पटले, संदीप भंडारी, अनिल पावरा, महेंद्र तडवी, वाहनचालक हिंमत पावरा यांनी सहभाग घेतला.पुढील तपास वनपाल माकडकुंड भरतसिंग परदेशी हे करित आहेत.