सायबर क्राईम ची वाढती संख्या ग्राहकांसाठी चिंताजनक त्यासाठी ग्राहक जागृती आवश्यक - तहसीलदार गिरीश वाखारे
तळोद्यात महसूल विभागातर्फे ग्राहक दिन उत्साहात साजरा
ग्राहक व अधिकाऱ्यांच्या प्रश्नोत्तराच्या जुगलबंदीने रंगला कार्यक्रम
तळोदा - संगणकीकरण व मोबाईल च्या वापरामुळे सायबर क्राईम द्वारे सुशिक्षितांची वाढती फसवणूक ग्राहकांसाठी चिंतेचा विषय असून ग्राहकांनी सावध रहावे ग्राहक आयोगाकडे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत ग्राहक अजूनही उदासीन आहे नसत्या जाहिरातींचा भडिमार करून अनावश्यक वस्तू खरेदीस प्रोत्साहित करुन ग्राहक फसविला जात आहे यामुळे ग्राहक जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार गिरीश वखारे यांनी काल महसूल विभागातर्फे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले यावेळी अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष किर्तीकुमार शहा तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष उल्हास मगरे उपाध्यक्ष भरत भामरे सचिव कैलास शेंडे डॉ सौ कीर्ती लोखंडे ऍड जयेशकुमार शहा ऍड राहुल मगरे सहयोग सोशल ग्रुप चे अध्यक्ष ऍड अल्पेश जैन प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष राजेश चौधरी तालुका सचिव रमेश भाट संघटक प्रा राजाराम राणे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते ऍड जयेशकुमार शहा यांनी ग्राहक संरक्षण कायदा व त्यातील तरतुदी व नव्याने झालेली सुधारणा या बाबत विस्तृत माहिती दिली यावेळी विद्युत वितरण विभागाचे सहा कार्यकारी अभियंता तिरुपती पाटील भारत संचार निगमचे ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर विकास महावर भारतीय स्टेट बैंकेचे सहा शाखाधिकारी अनिल सुर्वे सेंट्रल बैंकेचे शाखाधिकारी मोहन भालेकर किरण गॅस एजन्सीचे किरण पवार यांनी जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी व ग्राहकांनी उपस्थित केलेल्या समस्या व प्रश्नोत्तरांना समर्पक उत्तरे देऊन समस्यांचे निराकरण केले अधिकारी पुरवठादार व ग्राहक यांच्यातील प्रश्नोत्तराच्या जुगलबंदीने यावेळी कार्यक्रमात रंगत आणली गॅस एजन्सीचे किरण पवार यांनी उज्वला गॅस योजनेची तसेच गॅस वापरतांना घ्यावयाच्या सुरक्षेची माहिती दिली अभा ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष उल्हास मगरे यांनी ग्राहकांना सेवा देणारे सर्व शासकीय अशासकीय विभाग उत्पादक पुरवठादार वितरक व्यापारी व ग्राहक यांच्या समन्वयातून ग्राहकांच्या समस्या निवारण्यासाठी व ग्राहक हितासाठी अ भा ग्राहक पंचायत सदैव कटिबद्ध असल्याचे सांगून मार्गदर्शन केले प्रा राजाराम राणे यांनी ग्राहक पंचायतीचे कार्य उद्दिष्टे स्पष्ट केली शेवटी अध्यक्षीय भाषणात जिल्हा उपाध्यक्ष किर्तीकुमार शहा यांनी बाजारातून वस्तू खरेदी करतांना फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व फसवणूक झाल्यास कुठे व कशी दाद मागावी याचे मार्गदर्शन केले यावेळी प्रकाश ठाकरे साकऱ्या पाडवी अरुण मगरे अनिल परदेशी भगवान कर्णकार रामवतार यादव दिलीप जोहरी श्रीमती कल्पना पिंपरे भिका चव्हाण यांच्यासह महसूल व प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी ग्राहक पंचायतीचे सदस्य कार्यकर्ते व्यापारी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेशकुमार भाट यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी यांनी केले प्रा राजाराम राणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे अव्वल कारकून एस जी वाडेकर सोनवणे यांनी परिश्रम घेतले
चौकट - या वेळी तहसीलदार गिरीश वखारे यांना कॉल करून फसवणुकीचा उद्देशाने बँक अकाउंट व एटीएम कार्ड चा तपशील विचारल्याचा परंतु त्यांनी माहिती न देता कशी फसवणूक टाळली याचा किस्सा कथन केला व ग्राहकांनी सावध राहण्याचा इशारा तहसीलदारांनी यावेळी दिला