पालकमंत्र्यांकडून आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस
इंडिया न्युज प्रतिनीधी
पुणे दि:-२४पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रुबी हॉल हॉस्पिटल येथे भेट देऊन आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली. आमदार श्री. गोरे यांच्या उपचाराविषयी डॉक्टरांना सूचना देऊन ते लवकर बरे व्हावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सायंकाळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही रुबी हॉल हॉस्पिटल येथे आमदार श्री. गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉल हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेझ ग्रँड आदी उपस्थित होते.
फलटण जवळ आमदार श्री. गोरे यांच्या वाहनाला अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुबी हॉल हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्रतिनीधी:-DIGAMBAR WAGHMARE