Type Here to Get Search Results !

बहना भाग मत जाना या .युवती संस्कार शिबिराचे आयोजन.



बहना भाग मत जाना या .युवती संस्कार शिबिराचे आयोजन.

हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे पाटील


मुलींवर अविश्वास नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने भाजपा महानगर नांदेड तर्फे रविवार दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एनएसबी कॉलेज नांदेड येथे " बहना भाग मत जाना " या युवती संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये लाखो युवकांचे प्रेरणास्थान असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते सोपानदादा कनेरकर यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार असून लव्ह जिहादच्या दृष्चक्रात अडकलेल्या तरुणी आपबिती कथन करणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.


शिबिराचे हे अकरावे वर्ष असून यावर्षीचे शिबिर हे मुली व महिलांसाठी राखीव आहे. या शिबिरात वेळेवर उपस्थित राहणाऱ्या मुलींना व महिलांना क्युबिक बायोटेक तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच सोडतीद्वारे भाग्यवान ठरणाऱ्या चार मुलींपैकी दोघींना टॅलीचे तर इतर दोघींना एमएससीआयटी चा तीन महिन्यांचे कॉम्पुटर प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.दिलीप ठाकूर यांनी यापूर्वी बहना भाग मत जाना या शिबिराचे दहा वर्ष आयोजन केले होते काही वर्ष हा उपक्रम खंडित झाला होता. परंतु श्रद्धा वालकर या तरुणीला आफताब नावाच्या हैवानाने 36 तुकडे करून हत्या केली असल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना पळवून नेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नांदेडमध्ये दर आठवड्याला अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक पालकांच्या आग्रहास्तव यावर्षी पुन्हा एकदा बहना भाग मत जाना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सोपानदादा कनेरकर यांचे आतापर्यंत देशभरात शेकडो व्याख्याने झाले आहेत. त्यांच्या व्याख्यानातून श्रोते खळखळून हसतात आणि बऱ्याच वेळा रडतात. त्यांची अनेक गाजलेली व्याख्याने युट्युबवर उपलब्ध आहेत. त्यांचे सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स आहेत. एनएसबी कॉलेज नांदेड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे मुलींनी व महिलांनी वेळेवर येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा महानगर नांदेड तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad