Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगाना अर्ज सादर करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ



राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगाना अर्ज सादर करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज सादर करण्यास 31 डिसेंबर,2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.


केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.


शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी 15 जानेवारी, 2023 रोजी होईल तर संस्था पडताळणीची 31 जानेवारी, 2023 रोजी असेल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबर, 2022 पर्यत नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी 15 जानेवारी, 2023 रोजी होईल व संस्था पडताळणीची तारीख 31 जानेवारी,2023 राहील, असे श्री. नांदगावकर यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad