Type Here to Get Search Results !

बोरद येथे वैयक्तिक लाभाच्या योजनेसंदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत मार्गदर्शन.



बोरद येथे वैयक्तिक लाभाच्या योजनेसंदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत मार्गदर्शन.


   

 तळोदा तालुक्यातील बोरद आणि परिसरातील नागरिकांना पशुसंवर्धन विभागा मार्फत गाई, म्हशी, शेळी मेंढी गट, कुकुट पालन अश्या नावीन्य पूर्ण वैयक्तिक लाभाच्या योजना बाबत माहिती देण्यात आली आहे.

    या सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी पशुधन विकास अधिकारी फिरते पथक पशू चिकित्सालय अक्कलकुवा येथील किशोर सामुद्रे, पशुधन विकास अधिकारी डॉ.विशाल नवले व बोरद येथील पशुवैद्यकीय 

अधिकारी डॉ.महेंद्र जमदाळे, साहाय्यक संजय बहिरम हे उपस्थित होते.

       जि.प.शाळा बोरद येथिल प्रांगणात समाज प्रबोधन तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली.यामध्ये ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी,व सुशिक्षित बेरोजगार यांना स्वयं रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेतंर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरी विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजने करिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सन २०२१-२२ पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ लागू ठेवण्याची सोय केली आहे.

    त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबी करता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

     त्यामुळे नाविन्यपूर्ण 

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाह्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी शेगवा लागवड यासाठी अनुदान देण्यात येणार आहे

   अशा विविध योजनांची माहिती उपस्थित डॉ.सामुद्रे व नवले तसेच जमदाडे यांच्या वतीने देण्यात आली.तरी या योजनांचा लाभ जास्तीतजास्त शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार ,पशुपालक यांनी घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

     यावेळी बोरद येथील मनोहर भिलाव,संतोष ढोडरे.लक्ष्मण साळवे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad