राजविहिर ग्रुप ग्राम पंचायतीत सरळ लढत प्रचारात रंग
तळोदा तालुक्यातील एकमेव निवडणूक असलेल्या राजवीहीर ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक एरवी एकतर्फी होणाऱ्या यावेळी दोन पॅनल मध्ये सरळ व अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
25 जनेवरी 1959 मध्ये स्थापन झालेल्या राजवीहीर ग्रामपंचायतची निवडणूक भाजप पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनल व ग्राम विकास पॅनल मध्ये सरळ लढत होत आहे. प्रचाराची रंगत आली आहे. सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशिब अजमावत आहेत प्रथमच दोन पॅनल सरळ लढत लक्षवेधी ठरत असून एका पॅनल सत्ता टिकवण्यासाठी तर परिवर्तन पॅनलचे परिवर्तन आणण्यासाठी अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत आहे प्रथमच दोन पॅनल मध्ये काट्या लढत रंगणार असून मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे