जांबीपाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.....
तळोदा : श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित विद्यावर्धिनी आदिवासी निवासी प्राथमिक आश्रम शाळा, जांबीपाणी ( ता.अक्कलकुवा) येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.ज्येष्ठ शिक्षक गोविंद पाटील व शाळेचे अधिक्षक दिलीप चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक चेतनसिंग अहिरराव,मांगीलाल भदाणे,राजेश पाडवी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी माहिती सांगितली व मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन स्वामी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज नरसिंगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक रामकृष्ण शिंदे, भाऊसाहेब कुवर,धिरेंद्र वसावे,महेश रामोळे,महेश सैंदाणे अधिक्षीका श्रीमती.बी.के.वसावे, पुरूषोत्तम मोरे आदी यांनी मेहनत घेतली.