प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिळाले जातीचें दाखले
कोठार आश्रमशाळेत विद्यार्थ्याना जात प्रमाणपत्र वाटप
आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम
तळोदा : तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थी सशक्तिकरण अभियानाअंतर्गत विद्यार्थ्याना प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते मोफत जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तळोदा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तळोदा,अक्कलकुवा,धडगाव तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थी सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मोफत जातीचे दाखले व आधार कार्ड अपडेट करून देण्यात येत तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने न्यूक्लिअर बजेट अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे.
बुधवारी कोठार येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, उपस्थित होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नेटवर्क अभियंता वाल्मीक पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर, पाटील माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील,आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कोठार आश्रमशाळतील ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना जातीचें प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना मंदार पत्की मोठया प्रमाणात विद्यार्थ्याना जातीचें मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विदयार्थी सशक्तीकरण अभियानाची विद्यार्थ्यांना माहिती दिली.उर्वरीत विद्यार्थ्यांनी आपल्या जातीचे दाखले काढून घेण्याचे आवाहन केले त्यासाठी आवश्यक कागदपत्र शिक्षकांकडे जमा करावे अशा सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज चिंचोले,जयवंत मराठे,निंबा रावळे योगेश चव्हाण,योगेश भारती, जितेंद्र चौधरी, हरी भारती, शंकर मुठाल,नीता गुरव,कविता पावरा,पन्नालाल पावरा,जयेश कोळी,महेश वायकर, ब्रह्मराज नाईक,संदीप पाठक,अनिता पावरा आदिसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हंसराज महाले यांनी केले.