गावकऱ्यांची "ची सामाजिक बंधिकली मदतीसाठी 'अनेकांचे 'हात' सरसावले लक्ष्मीकांत चे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारले
लोहा दि. शिवाजी मुंडे
परिस्थिती गरीबीची... एमबीबीएस साठी नंबर लागला . पण पैसे नाहीत. डॉक्टर होण्याचे लक्ष्मीकांत चंद्रकांत कहालेकर यांचे स्वप्नपूर्ती धूसर होतु . मुलगा डॉक्टर व्हावा ही आईची इच्छा अपूर्ण राहते की काय? अशीच आर्थिक परिस्थिती होती.पण दै.लोकसत्ता रविवारी च्या अंकात कौटुंबिक परिस्थिती समोर आली व गावातील तरुणांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून मदतीसाठी अहावन केले त्यामुळे अनेकजण मदतीसाठी सरसावले.सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील सोमठाणकर यांचा समर्पित भाव मोठा आधार ठरला.व लक्ष्मीकांत यास डॉक्टर करण्याचे त्यांच्या आईचे स्वप्न साकार झाले जळगाव येथे १३रोजी ऍडमिशन घेतले
जुन्या लोह्यातील लक्ष्मीकांत चंद्रकांत काहळेकर
मुलाला एमबीबीएस डॉक्टर करण्याचे तिचे स्वप्न अपुरे राहणार ..? असे वृत रविवारी(ता. ११) रोजी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाले
.प्रसिद्ध मेडिकल दुकानदार अनिल तोष्णीवाल (नांदेड) यांनी आपल्या मातोश्री - राजाबाई राधाकिशन वोष्णीवाल यांच्या वतीने एक लक्ष रुपयाची मदत दिली. सेवानिवृत अधिकारी रामदास पाटील सोमठाणकर यांचा महाराष्ट्रातील अधिकारी हा ग्रुप आहे .त्यावर बातमी तसेच मिशन' लक्ष्मीकांत डॉक्टर' असे नमूद करत मदतीचे अहवान केले. आणि 'अनेक जण' मदती साठी पुढे आले. होतकरू विद्यार्थी लक्ष्मीकांत यांच्या प्रवेश फीससाठी जवळपास ४लक्ष ३०हजार रुपयांची व्यवस्था झाली. तहसीलदार आशिषकुमार बिरादार यांचा याच ग्रुपवर पाठपुरावा महत्वाचा ठरला. पुढे.
श्रीशिमोएशि" संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांनी एक लक्ष रुपये मदत दिली -
संस्था सचिव भाई कुरुडे यांनी लक्ष्मीकांत व त्यांची आई स्वातीबाई यांचा सत्कार करून ही रक्कम दिली. युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी लक्ष्मीकांत यांला होस्टेलचा खर्च वर्षा साठी ७५ हजार इतका आहे तो प्रविण पाटील हे उचलणार आहेत . शिक्षक नेते मधुकर उन्हाळे यांनी 'बातमी' वाचून आवाहन केले आणि पाहता पाहता एक लक्ष पाच हजार रुपये जमा झाले .ही नगदी मदत त्यांनी सहकारी शिक्षकांच्या उपस्थितीत दिली.
लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी तसेच लक्ष्मीकांत यांच्या आठवी पासून शिक्षणाला मदत करणारे दिपक कानवटे, सचिन मुकदम यांनी प्रत्येकी एकावन्न हजार रुपयाची मदत केली.
कापड व्यापारी यांचा' सारथी ग्रुप कडून अभिषेक क्लॉथ चे नागसाखरे यांनी मोठी रक्कम ग्रुप च्या वतीने दिली नाट्य लेखक शेषराव काहलेकर ,हरिहर धुतमल राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ शिरसीकर, शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण,उपमुख्याध्यापक ईश्वर शेटे , 'कैलास कहाळेकर, शिवा मुंडे , गजनान चव्हाण,गजानन जाधव यासह अनेकांचे पाठबळ मिळाले.
सुदर्शन शिंदे, शंतनू कैलासे, गटनेता करीम शेख कंत्राटदार दता वसमतकर, भीमा पाटील शिंदे-प्रसाद पोले, गणेश बगाडे, गजू कांबळे, दता शेटे, हरीभाऊ शेटे असा अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना, तसेच दातृत्व असणारे अनेक हात मदतीला सरसावले आणि एका दिवसात लक्ष्मीकांत यांच्या फीस ची व्यवस्था झाली
जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, सुहास सरदेशमुख संपादक शंतनू डोईफोडे , ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी व हरिहर धुतमल यांचे सहकार्य महत्वाचे ठरले मदतीसाठी अनेकजणपुढे आले एका दिवसात लक्ष्मीकांत यांच्या फीस ची व्यवस्था झाली. .आणि मंगळवारी त्याने जळगाव येथे एमबीबीएस साठी ऍडमिशन घेतले
त्यांच्या आईचे स्वप्नपूर्ती झाली.सेवानिवृत्त अधिकारी रामराव पाटील सोमठाणकर यांचे प्रयत्न कामी आले