Type Here to Get Search Results !

नूतन सरपंच आणि सदस्यांनी लोकांचा विश्वास सार्थ ठरवून ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी



नूतन सरपंच आणि सदस्यांनी लोकांचा विश्वास सार्थ ठरवून ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी  

        




ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने केवळ सदस्य व सरपंच यांना निवडून दिले नाही तर त्यांच्यावर गावाच्या विकासाची खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि ती नूतन सरपंच आणि सदस्यांनी लोकांचा विश्वास सार्थ ठरवून ती यशस्वीरित्या पार पाडावी असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी केले.




      तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुन आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न झाला. यावेळी आमदार आमश्या पाडवी बोलत होते.




अक्कलकुवा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयात भव्य सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, अक्कलकुव्याचे माजी सरपंच प्रेमचंद जैन, युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट, जेष्ठ नेते पृथ्वीसिंग पाडवी, तालुका प्रमुख मगन वसावे, आरिफ मक्राणी, जुबेर मक्राणी, छोटु हाश्मी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे, आनंद वसावे, आदी उपस्थित होते. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुव्याच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा, सोरापाडा सरपंच अंजू आमश्या पाडवी, घंटाणी सरपंच विकेश जेका पाडवी, विरपुर सरपंच अजीत सुभाष तडवी, पोरांबी सरपंच संगिता नरेश वळवी, टावली सरपंच बबिता राजेंद्र वसावे, खड़कुना सरपंच मोगराबाई दशरथ वळवी, कोलवीमाळ सरपंच गुमानसिंग बिज़्या तडवी,चिवलउतार सरपंच दिनेश खात्र्या वसावे, पेचरीदेव ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच वसंत हुरजी पाडवी, यांचा व सर्व नव निर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी मार्गदर्शन केले. लक्ष्मण वाडीले, ललित जाट, विनोद वळवी यांनीही याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला सरपंच कुवरसिंग वसावे, राजेंद्र वसावे, पोहरा सरपंच अश्विन तडवी, काकड़खूंट सरपंच विनोद वळवी, माजी तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, जी डी पाडवी, छोटू हाशमी, शहर प्रमुख रविन्द्र चंदेल, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी, किशोर ठाकुर, युवानेते कुणाल जैन, रोहित सोनार, जिग्नेश सोनार, गोलू चंदेल,आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच निवडुन आलेले. ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News