मानुसकीचा आधार तरुणाच्या निधनाने पडले कुटुंब उघड्यावर मित्रांनी वर्गणी गोळा करून दिली मदत
कुशल भगत अकोट
अकोट..गांधीग्राम येथून जवळच असलेल्या निंबोरा येथील मनोज राजकुमार ओहेकर या 34 वर्षाच्या तरुणाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला, त्यामुळे त्याचे कुटुंबियांचा आधार गेल्याने ओहेकर कुटुंब खचून गेले मात्र अश्यातच मित्रांनी त्या कुटूंबीयाना आधार दिला.मनोज ओहेकर हा निंभोरा येथील युवक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होता म्हातारे आई वडील पत्नी व एक लहान मुलगी असा संसाराचा गाळा चालत असतानाच त्या युवकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला, हलाखीची परिस्थिती असल्याने इयत्ता दहावी-बारावी पासून सोबत शिकलेल्या मित्रांनी एकत्रित येऊन वर्गणी गोळा केली ही वर्गणी एकूण 36000 रु झाली, त्यांनी ती रक्कम त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केली.
यामध्ये राजिक शाह,दिपक काठोडे,विट्ठल राठोड,रोशन पागृत,प्रभुदास बोर्डे,मंगेश ओइंबे,गौरव पाणपते,नागेश इंगळे,मंगेश खंडारे,योगेश हूर्साल,मंगेश पाटकर,अनिल गावंडे,शेख बोमिन,पंकज इंगळे,संदीप ओईम्बे,सिद्धार्थ बोदडे,स्नेहल देवर,शिवा भालेराव,प्रवीण मोडक,प्रमोद मोडक,सचिन बहाकर,माधव बाठे,आशिष शेंडे,रवी हलवणे,सुरेश कौलकर,असलम शाहा,ज्ञानेश्वर साबळे,पंकज टाकळकर,सचिन ओइंबे,पांडुरंग खराबे,प्रवीण घाटे,रितेश देशमुख,योगेश अठराळे,अमरदिप ढोले,राहुल अवझाड,दिलवान सदाशिव,निलेश बकाल,संदीप ऑइम्बे,प्रमोद ओहे,संदीप वानखेडे,रवी चऱ्हाटे,डॉ.मंगेश कोरडे,किशोर घुगे,शुद्धोधन ओहे,अश्विन ठाकरे....या सर्व मित्रानी मदत केली.