कुटासा येथे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२४ वी जयंत्युत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे व खेळाचे आयोजन
कुशल भगत अकोट
अकोट तालुक्यातील कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुटासा येथे डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंत्यत्सवा निमित्ताने आज दि.26/12/2022 रोजी कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात आले होते या खेळाचे उदघाटण दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र राऊत पोलीस पाटील गजाननराव उगले पंजाबराव कवटकार अनंतराव कापसे पत्रकार अशोकराव झामरे पत्रकार निरंजन गांवडे पत्रकार कुशल भगत श्रीराम कापसे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया चे प्रभारी मुख्याध्यापक संतोष चरपे सर अंकुश देशमुख सर राठोड सर ठाकरे सर कार्यक्रमाचे उत्सव प्रमुख सतिष चतार सर आरु सर व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते तर कबड्डी खेळात विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता..