Type Here to Get Search Results !

महसूल खात्याच्या आशीर्वादाने रॉयल्टी चोरांना सुगीचे दिवस



महसूल खात्याच्या आशीर्वादाने रॉयल्टी चोरांना सुगीचे दिवस

महसुलीची खाजगी वसूली शासनाला राॅयल्टाीचां ठेंगा!

तहसीलदारांचे कारवाईचे आदेश                                                                                                     मुरबाड दिनांक 26 प्रतिनिधी लक्ष्मण पवार 

                                                मुरबाड तालुक्यातील नद्या टेकड्या, विटभट्यावाल्याच्या, रेती माफियांच्या विळख्यात , अवैध वाळू(रेती) ची होते राजरोस वाहतूक


: माळशेज घाटातून वाहणाऱ्या काळु , शाई , कनकविरा , डोईफोडी ,मुरबाडी , बारवी या नद्यावर रेती माफियांनी कब्जा केला असुन , अवैध उत्खनन व वाहतूकीमुळे या नद्यांना विद्रुप करून टाकले असतांना गावपातळीवरचे शासकिय महसूल कर्मचारी वसुलीत गुंतल्याचा आरोप नागरिक करीत आहेत व तसेही या माळशेज हायवे लगत शेकडो विटभट्या रासरोस पणे सुरू असता गावोगावी किमान प्रत्येक गावात अनेक विटभट्या व्यावसाईक कर्यरत असता अद्याप पावेतो मुरबाड महसुल विभागात माती,रेतीची व साधारण परवाना हाताच्या बोटावर मोजणा-यांनी घेतले असल्याचे खात्रीलायक माहिती असून शासकिय महसूल विभाग की वसूल विभाग असल्या आरोप नागरिकाकडून होत आहे, 


 मुरबाड तालुक्यातील २२७ महसुली गांव व १२७ ग्रांप सोबत मुरबड नगरपंचायतीच्या महसुलाची जबाबदारी तहसीलदार महसुल विभाग कार्यालयावर असून हा शासकिय महसुल गोळा करण्यासाठ महसुल विभागाचे १)मुरबाड २)शिवळे ३)सरळगांव ४)म्हसा ५)देहरी ६)न्याहाडी ७)टोकावडे ८)धसई असे आठमंडळ अधिकारी व ४८ तलाठी असुन , तालुक्यात अवैध उत्खनन नदिनाल्यावर वाळूचा(रेती)चा टेकड्या भूईसपाट करीत मातीची वाहतूक हि शासनाची शासनाची राॅयल्टी महसुल बुडवून रासरोस सुरू केली जात आहे, तालुक्यात काळु , शाई कनकविरा , जोलंड , बारवी , मुरबाडी या नद्यांचा उगम माळशेज घाटातून होत असून , या नद्यांच्या पात्रात न्याहाडी , सावर्णे , मोरोशी , पारगांव ( किसळ ), मढ , शिरोशी वादाणे या ठिकाणी रेतीचे साठे मुबलक असून येथून राजरोस रेतीची वाहतूक मुरबाड बदलापूर , ओतून , आळेफाटा इत्यादी ठिकाणी केली जात आहे . 

 

 या चोरट्या रेतीच्या वाहतूकी सोबत डबर खाणी व माळशेज हायवे लगत ते गावोगावी विटभट्ट्या जोमात सुरू आहेत मात्र मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या महसूल विभागात गेल्या आॅक्टोबर महिण्या पासून हे व्यावसाय सुरू असता,खरशेतगाव,वेळूक,म्हासा येथील विटभट्टया वाल्यातीन व मोहप ,माळ येतील मातीवाहतुक करणा-या दोन जनांनी साधा परवाना घेतल्याची अधिकृत नोंद आहे  


, फक्त तीन विटटी व्यावसाईक व दोन मातीवाहतुक पनवाने घेतल्याचे तहसीलदार कार्यालयातून अधिकृत माहिती मिळाली व हि माहिती पाहता, व त्यातच शासनाने गौण खनिज उत्खननाचे दर प्रतिब्रास ६०० एवढे भरमसाठ वाढवल्याने , शासनाची तिजोरी भरण्यापेक्षा तहसीलदार , मंडळ अधिकारी तलाठी ततस्म महसुल विभाग परस्पर प्रकरण निस्तरत असल्याचे बोलले जाते,  


  व जर तस नसत तर गावोगावी महसुल विभागाची कार्यालये तलाठी सर्कल यांचे जाळे असताना हजारो भट्टया नागरिकांना दिसतात परतु वसूली विभागाला का दिसत नाही हा प्रश्न नागरिकांना पडत आहे,  


        

     

 (मुरबाड तहसीलदार संदीप आवारी यांचा कोड ) 


 तालुकाभर या महसूलाचा चाललेला गौड बंगाल, शासनाचा महसूल बुडवणा-यांना चाप लावण्याची सुचना तहसीलदार संदीप आवारी यांनी दिली असली तरी तलाठी आणि मंडळ अधिकारी किती साथ देतात हा पश्न देखील गौण खनिज चोरी सारखा गौण म्हणावा लागेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News